जवानी….
दुरावलेल नात पुन्हा जुळताना
ते डोळ्यात तराररेलं, अनमोल पाणी…
हरवलेला जुना मित्र पुन्हा भेटताना
ती आठवणींतून उभाररेली, दोस्तीची कहाणी…
या विरह दुखः मुळेच आली मिलापास जवानी
चुकलेल्या बेहोश मार्गात धक्के खाताना
ती आठवलेली गुरूची आकाशवाणी
आज होशाने मागे वळुन बघताना
ती झालेली स्वताःची हसुन पडताळणी
या बेहोशीच्या खेळामुळे आली होशास जवानी