स्वःतः साठी जग गड्या
ओलांडली पस्तीशी आता
बासं करं खोटी दुनियादारी रं…
थोडंसं ते डोळं झाकुन, आपलाच तो श्वास राखुन…
स्वतःसाठी जग गड्या…पाऊल थकलं न्हाई॥
रोज..कोवळ्या या उन्हातुन
थोडं पुढं जाऊ गड्या
पाऊल थकलं न्हाई गड्या, पाऊल थकलं न्हाई॥
हात पसरून गड्या सुख येत न्हाई रं
डोळझाक करुन बी दुखः जात न्हाई रं
नाटक हे सुख_दुखाच,
रचलयं कुणी रं गडया…उमगत न्हाई…
उमगत न्हाई गड्या, पाऊल थकलं न्हाई॥
लाख मोलाचा आहे तुझा जीव रं…
स्वामी तु या जीवाचा, न्हाई कायेचा चाकर रं…
सोडून ती मोह माया..
स्वःतः साठी जग गड्या…पाऊल थकलं न्हाई॥
स्वः साठी जग गड्या…पाऊल थकलं न्हाई॥
[ वयाची पस्तीशी पर्यंत बरेच जणं संघर्ष करुन आयुष्य समृद्ध करतात …पणं या संघर्षात, वाढत्या पगारात , पदोन्नतीत आपणं आरोग्याकडे दुर्लक्ष करतो…स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणी आजाराला आमंत्रण देतो.अशा सर्व पस्तीशी ओलांडणाऱ्या मित्रांसाठी…हे चार शब्द समर्पित.]
Well explained…