विरोधाभास

कुठं तो निवांतपणा, न संपणारा अमाप वेळ
कुठं तो भावा कुठायसं ?  म्हणत मित्रांमुळे  वेळेलाच न लागणारा वेळेचाच मेळ…
अनं काय ईथ नुसती भागदौड, ( में समय हुं Respect me) म्हणत शिक्षा देणारा वेळ.
साला सगळच विरोधाभासी होत चाललया

कुठं ती मनसोक्त आयच्या गावात शिवी..
अनं काय ईथ ‘F’ word बाहेर पडना झालया
मराठीतुन हिंदीच सरकार रडाया लागलया ( मेरेको, तरेको)
साला सगळच विरोधाभासी होत चाललया

कुठं तो जिव्हाळा, आत्मियता,प्रेम
कुठं तो मित्रांचा मेळावा विथ नो फेम गेम
निस्वार्थी पणे म्हणतात त्याला काय हुतया?
ईथ स्व स्वार्थच काय लोकांना सुटना झालयां
सगळच विरोधाभासी होत चाललया..

Leave a Comment