मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत. शारीरिक, मानसिक,आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक या पाचही स्तरांवर माणसाने प्रगती करायला हवी. एक बॅलन्स लाईफ हवी असेल तर नक्की या पाचही स्तरांवर प्रगती करायला हवी. पण अध्यात्मिक प्रगती नेहमीच मागे पडलेली दिसते त्याचं कारण अध्यात्म अतार्किक आहे अध्यात्म खूप अवघड आहे हा सर्वात मोठा गैरसमज.
पण जेव्हा समजेल की पैसा असूनही समाधान नाही, नाती असूनही पूर्णता नाही, पद प्रतिष्ठा आहे पण झोप अन शांतता नाही, सर्व काही आहे पण सगळं असूनही काही नाही हा आयुष्यातील रितेपणा कसा घालवावा, मानवी जीवनाचा उद्देश नककी काय, मृत्यू नंतर जीवन आहे का असे प्रश्न ज्या दिवशी पडतील तेव्हा एकच वाट दिसेल ती म्हणजे अध्यात्माची… अध्यात्म इथे सापडतो एक आनंद…एक उच्चतम अवस्था….एक अशी सच्चिदानंद अवस्था जी प्रत्येक संतांनी जगली आणी ती मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग जगाला अर्पण केले जसे नाम, जप,तप, ध्यान, कर्म,भक्ती इ.
माऊली संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,संत एकनाथ, जगद्गुरु संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, संत चोखामेळा ,संत गोरा कुंभार अशा ईतर अनेक महाराष्ट्रातील संतांना कोटी कोटी धन्यवाद….आज परत महाराष्ट्रात जगात भक्तीची लाट उसळली जाऊदे हीच परमेश्वर तुज चरणी प्रार्थना….