बायको, रानभुलं आणी विठ्ठल….

काल जेवण झालं अनं टि.व्ही पाहत होतो… बायको पण सोफ्यावर बसली होती…अचानक थोड्या वेळाने बायकोचे हुंदके ऐकायला आले….बापरे….म्हणलं काय ग झालं तरी काय ? कोण गेल की काय ? अस अचानक रडायला काय झाल? काय दुखतय का? दाढ दुखतीय का? बोल …बोलतरी

ती म्हणाली…तुमच लक्ष नसत? आजकाल…

बोंबला तिच्या मायला…म्हणलं काय सिक्रेटस तर तशी नाहीत आपली आता..आणी नविन काय झालीच तरी  तेवढी हिंमत नाही की झेपेल…आणी असं बरच काही दोन मिनिटात नजरेसमोरून गेलं…
म्हणलं माझ खरच काय लफडं नाही आणी असेल तर आधी तुला सांगुनच करेल….मग जरा हसली …

मग विचारलं खर सांग…काय झालं?
समोरच्या उत्तर भारतीय कुटुंबातील आंटी बरंच काही माझ्याबद्दल वाईट बोलतात…तोंडावर गोड नंतर चुगली करतात…मी एवढी मदत करते चांगली वागते तरिही…

मी मोठयाने हसून म्हणलं….
हा तर प्रत्येक बाईचा जन्म सिद्ध अधिकार आहे…त्यात मनाला एवढ लावुन घेण्यासारख काय?
तुला हे तिसऱ्या बाईने सांगितलं हे ही तितकच खरं नाही का…अश्या चर्चा चुगली हेच साधारण बाईचा शेजारधर्म असतो…तसं नसेल तर गप्पा मारायला टाॅपिक मिळत नाही..

आणी कुणाच काहीही असो…तुझ मन निर्मल असणं याची पावती म्हणजे हे अश्रुं  … ईतरांना धडा शिकवणं , सुधरणा करणं हे आपल्याला जमणं अशक्य आहे…जबरदस्ती करण…भांडण करणं…बदला घेणं असे अनंत विचार मनात आणुन …सतत राग द्वेष करून आपलं नुकसान आपणच करत असतो…काही लोक तर सात जन्म द्वेष च्या शपथा घेऊन ॲटॅक ने जातात तर काहिंना या सततच्या ताणाने मधुमेह धरतो…काय परवडतं यात कुणास ठाउक…म्हणुन क्षमा करं…आपणही चुकतोच तसा समोरचाही…

ईतरांचा स्वभाव बदलणं तसं खुप औघडं….प्रत्येक जण एक वेगवेगळा प्रोग्राम आहे….आपल्या हातात एक आहे ते आपलं विचारांचे तरंग नेहमी चांगल्या भावनेच्या हाय फ्रिक्वेन्सी त ठेवणं…. जसा तु द्वेष राग संतापाचे तरंग सोडले तसेच समोरचा तेच तरंग पकडेल…आपण एका विस्तृत चेतने च्या जाळ्यात एकमेकांशी जोडले गेलो आहोत….हा अदृश्य नियम आहे…म्हणुन तु तुझा तरंग बदलं…प्रेम आनंद उत्साह क्षमाभाव हाच मुळ माणसाचा स्वभाव आहे … बाकी ई. स्वभाव हा फक्त नी फक्त अहंकारच…आपणं क्षमा करणं ..क्षमा मागणं महत्वाच…. जसं विठ्ठल वारीत कुणीही लहान थोर असो …सगळेच एकमेकांच्या पाया पडतात….त्यातच खरा विठ्ठल अनुभव असतो…विठ्ठल ही अनुभवण्याची गोष्ट आहे…
वारकरी विठ्ठलाच रूप सर्वांभुती पाहतो….अनुभवतो…हा अनुभव मिळवणं तेवढं सोप्प नाही अनं याच साठी हा रचलेला खेळं….या खेळालाच ईश्वर लिला…म्हणलं जात…मला तर आज त्याला रानभुलं म्हणावसं वाटतंय…जंगलात हरवणं एकाच जागी पुन्हा पुन्हा येणं म्हणजे रानभुलीत अडकणं…

विठ्ठला…
तु एक रानभुलं आहेस
शेवटी फिरून फिरून
कधी वैतागुन संतापुन
पुन्हा तु तीथेच आणतोस
शेवटी पर्याय एकच ठेवतोस
समर्पण….. संपुर्ण समर्पण
याशिवाय मुक्तीचा..मी..वेगळा
मार्ग शोधून काय ऊपयोग?
या समर्पणातुन प्रकटतो
तो अनहत नाद…विठ्ठल
विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…

1 thought on “बायको, रानभुलं आणी विठ्ठल….”

Leave a Comment