खुप सीमित अस आमच आयुष्य ….वाट दिसेल तस चालण… प्रवाह जिथे घेऊन जाईल तस वाहण हेच काय ते आमच्यासारख्या कर्मचारी वर्गाच आयुष्य….एका प्रतिष्ठित संस्थेत नोकरी एवढच काय ते आमच अस्तित्व…दिवस उगवला कि ऑफिस च्या कामाची चिंता एवढी चिकटते की दिवस मावळला , प्रवास करून घरी परतलो तरीही झोप येत पर्यंत ती सुटत नाही. तस पाहिल तर एका सामान्य व्यक्तीच अस्तीत्व नेमक असत तरी काय?
मग प्रश्न पडले पाहिजेत नेमक अस्तित्व काय ? स्वरूप काय ?आणी अस काय केल पाहिजे की जेणेकरून हा हरवलेला माणुस पून्हा जीवंत, पुन्हा जिंदादिल झाला पाहिजे. त्याला विचार स्वीच ऑन आणी स्वीच ऑफ अस काहितरी दिल तर कदाचित हे चिंता व तत्सम येणारे आजार टाळता येतील. त्यासाठी खुप काही केल पाहिजे अस म्हणल तर मानसिक तयारी होत नाही.
मग सर्वात सोप्पी गोष्ट काय असेल तर स्वतःच अस अंतर्भूत कौशल्य, अंगभूत गुण शोधले पाहिजेत. काळाच्या ओघात कुणी कुणी काय काय गोष्टींचा त्याग केला आहे हे शोधल तर मन थक्क होईल ….अन याला कारणीभूत आहे ही जबाबदारीची कुऱ्हाड …कुणी क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल , हाॅलीबाॅल, चेस, कॅरम, पत्ते खेळण सोडल तर कुणी गायनकला वा गाण ऐकण, पुस्तक वाचन, लेख वा कविता लिहिण, चित्रकला, नृत्यकला शिकण, ट्रेकिंग ला जाण ई. खरतर अशा कित्तेक लाखो गोष्टी छंद म्हणून जोपासण गरजेच होत पण आम्ही स्वतःला काॅलिटी वेळ देणच मुळात शिकलो नाही…हा छंद तुम्हाला जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ऑफिस, घर यातील प्रतेक संकटात एक विरक्ती वा अलिप्तपणा देईल…एवढा की हसत हसत तुम्ही संकटाला सामोर जाल नाहितर संकट येईलही जाईलही तुम्ही फक्त अनुभवताय असही वाटेल.
अन स्वतःसाठी वेळ मिळत नाही ही सबब ईथ
स्वीकार होऊच शकत नाही कारण तुम्हाला जी गोष्ट ह्रदयस्पर्शी आहे ….ती आवडीची असेल तर सवड काढण सोप्प होत…
हाॅबी वर जीव ओतून प्रेम कराल तर तीच हाॅबी तुमच जगण्याच आत्मबळ बनेल …आणी हे आत्मबल दिवसेंदिवस तुम्हाला शारिरीक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व अध्यात्मिक प्रगती करायला मदत करेल….हेच असेल तुमच विचार स्वीच ऑन आणी स्वीच ऑफ बटण…
हे खुप सोप्प आहे फक्त ओळखा स्वतःला…..
आणी आपल अस्तित्व सीमित नाही …ते असीम आहे या आकाशासारख….मुक्त अन नेहमी नवनवीन.
आपण ईथ जगण्यासाठीच आलो आहोत…..
Awesome thought and great writing skills