I am not शक्तिमान

I am not शक्तिमान

कालच जवळच्या मित्राला भेटलो, डायबिटीस झाला sugar 400 पार गेली त्याची कारणं शोधली तर हेच की स्वतःकडे कधीच लक्ष्य दिलं नाही, नुसता स्ट्रेस…स्ट्रेस… कधीही ओपन झाला नाही, मनमोकळेपणे भेटत नाही, नेहमी organisation & family pressure .. आजार हा काही एका दिवसात होत नाही, त्याला आपणच खत पाणी घालतो..त्याला खूप बोललो…पण तेच सगळीकडे दिसते आहे त्याला मीही अपवाद नाही…स्ट्रेस साला …हरामी… तो येतोच.

तोच मुंबई पुणे प्रवास करताना एक विचार प्रकट झाला…तो म्हणजे
” या जगातील दोन लोकांचा तुमच्यावर एवढा विश्वास असतो, एवढी श्रद्धा असते की ते तुम्हाला शक्तिमान समजतात… ती दोन माणसं म्हणजे एकतर Bayko आणि दुसरा Boss “

सगळी यांची अंधश्रध्दा आणि अंधविश्वास..

खरं काय ते आपल्याला माहीत…प्रत्येक माणसाला वेळेची, शरीराची, मानसिक शक्तीची मर्यादा आहे… ती समोरच्याने वेळेत नाही जाणली कारण तो करुणेचा सागर नाही , संवेदनशील नाही आणि तुम्ही काही शक्तिमान नाही… आपला जन्म हा नुसत्या घरच्यांच्या,नातेवाईकांच्या ,ऑर्गनायझेशन च्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी नाही झाला…

आणि सर्वात महत्त्वाच अशी शांती, प्रेम, विश्वास, आधार, आदर अशी भावनिक गरज पुरुषाला ही आहे. ही भावनिक गरज भागली नाही तर आजार चालू होतो. ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि काही वर्षात आजार दिसू लागतो कारण Whatever is created at mental plane has effect on physical plane..Every thought has a energy & vibration.

आपल्या मर्यादा ओळखा…Heal yourself daily…
How to heal? हे ज्याचं त्यानी शोधला पाहिजे आणि आळस निष्काळजीपणा मीपणा हाच आपला शत्रू आहे.

Leave a Comment