शीतयुद्ध कशामुळे होते? निर्माता कोण आहे?
घरात असो व ऑफिसमध्ये शाब्दिक वादावादी, शीत युद्ध हे नेहमीच असत आणी शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे राग आणि द्वेषाच्या भावनांनी मन भरून जात. शीतयुद्ध, शाब्दिक मारामारी करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु जेव्हा भावना तीव्र असतात, घटना तीव्र असते तेव्हा त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. जेव्हा आपण विचारांनी आणि रागाने भरलेले असतो तेव्हा शरीरात अस्वस्थता निर्माण होते, शरीरात अत्याधिक उर्जा निर्माण होते जी आवश्यक नसते आणि यामुळे निद्रानाश, तणाव, नैराश्य येते.
असं का होत?
कारण आहे स्वत: च मन (एक मिनी मी) जे कथा तयार करण्यास सुरवात करते, योजना बनवण्यास प्रारंभ करते, दृश्य निर्माण करते की मी हे करीन? मी ते करेन? मी शांत बसणार नाही? जे चूकीच आहे ते मी स्वीकारणार नाही? जो चुकत असेल त्याला शिक्षा व्हायला हवी …. वगैरे वगैरे …
मूलभूत भावना राग येणे आहे आणि कोणत्या घटनेमुळे हे घडले आहे की समजा कोणीतरी तुमचा अनादर केला आहे किंवा एखाद्याने तुमचा विश्वासघात केला आहे किंवा एखाद्याने तुमच्या इच्छेनुसार काम केले नाही आणि तुम्ही नाराज आहात. मग असोसिएटेड भावना ज्यामुळे क्रोध निर्माण झाला आहे ते आहे (अ) अनादर वाटणे ( ब) विश्वासघाताची भावना ( क ) संतापाची भावना.
आपले विचार आणि भावना कंपन (vibrations) आहेत. जर आपण सतत रागाच्या भावनांचे कंपन करत राहिलो तर आपण अशाच प्रकारची राग येणारी घटना आणि रागिट लोकांना आकर्षित करू कारण आपण सर्व जण एकमेकाशी आणी निसर्गाशी अवचेतन मनाने जोडलेले आहोत.
रागामुळे बर्याच लोकांना जिवंत आणि श्रेष्ठ वाटू शकते परंतु या अतिरेकीपणामुळे काय घडते ते पहा, विविध रोग होऊ शकतात. राग योग्यप्रकारे नियंत्रित न केल्यास ती व्यक्ती नियंत्रणाबाहेर जाईल. उदा. उच्च रक्तदाब वा सतत मानसिक ताणाने मधुमेह होऊ शकतो. हे फक्त रागाच्या बाबतीत आहे? कंटाळवाणे वाटणे,चिंता, दोष देणे, द्वेष, अपराधीपणा या ईतर भावनां बददल काय ? स्वतःला सकारात्मक भावनांकडे कसे वळवायचे हा महत्त्वाचा भाग आहे . म्हणजे हा सगळा गोंधळ कोण घडवित आहे हे समजून घेणे, कथा तयार करणे, वाईट बोलणे, लोकांबद्दल वाईट समजूत तयार करणे लोक वाईट समाज वाईट या अशा बाबतीत आपले मन खरोखर पटाईत आहे. लोक आरसे आहेत. जर मला राग येत असेल तर माझ्या समोरच्या व्यक्तीलाही आपोआपच राग येईल इतक सोप्प आहे हे. घटना इतकी लहान असू शकते योग्य संवादाने निराकरण होऊ शकते, लोकांच्या शैलीनुसार स्वभावानुसार हाताळण्याची योग्य कला व दृष्टीकोन तेही आपल्या शांततेवर परिणाम न करता शिकता येऊ शकते. हे एक कौशल्य आहे.
अनावश्यक कथा तयार करू नका, कुठलीही गोष्ट आधी मानसिक स्तरावर निर्माण होते नंतर तिचा भौतिक स्तरावर निर्माण होतो. काहीही तयार करु नकोस हे मनाला प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर आपणच निर्माता आहोत किंवा आपण प्रार्थना करतो , निसर्ग पूर्ण करतो. जर आपण काही विचार केला किंवा त्यावर लक्ष केंद्रित केले तर समान घटना प्रकट होईल. लहान मुले क्षमा करण्यास खूप फास्ट असतात, काही सेकंदात भावना बदलू शकतात, मग आपण मोठे का नाही?
माणसाची मूलभूत दैनंदिन गरज म्हणजे आनंद , प्रेम, धैर्य , सहकार्याची व समाधानाची भावना, आशा , उत्साह, शांती इ. भावना जगणे बाकी काही नाही. आपल्याला हे प्रथम विचारात निर्माण करावे लागेल तरच ते भौतिक स्तरावर निर्माण होईल.
आपल्या पूर्वजांनी आणि अध्यात्मिक गुरूंनी सांगितले आहे की आपला दिवस कृतज्ञतेने सुरू करा ( ईश्वर नवीन दिवसाबद्दल धन्यवाद, चांगल्या कुटुंबाबद्दल धन्यवाद, आरोग्याबद्दल धन्यवाद, संपत्तीबद्दल धन्यवाद, मित्रांबद्दल धन्यवाद) आणी आपला दिवस क्षमा करुन संपवा (प्रथम स्वत: ला माफ करा, स्वतःला पूर्णपणे स्वीकारा, लोकांना क्षमा करा, माझ्या शब्दांतून, विचारांमधून, कृतींमधून घडलेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा)
धन्यवाद आणि अं……क्षमस्व 🙏