काही वेळ का होईना जिवलग मित्रांना भेटल पाहिजे. मग वेळेची, शरीराची, मनाची कुठलीही मर्यादा असो ती मर्यादा तोडून भेटल पाहिजे आणि भेटून खूप मनसोक्त बोललं पाहिजे असही काही नाही. .
का विचारलं तर ? तुमचा खरा चेहरा, खरा स्वभाव हा फक्त मित्राला माहीत असतो आणि त्याला तुमचं आतील जग आणि बाहेरील जग माहीत असतं. मित्राला बाहेरच्या जगात चाललेल्या धावपळी पेक्षा तुमच्या आतील वेदनांची धावपळ कमी करणंच त्याला जास्त मॅटर करत असत. म्हणून फक्त भेटल पाहिजे …कारण quality of life बनवायला फक्त मित्रच मदत करतात असा माझा प्रामाणिक विश्वास आहे.
I am proud of Partner for his Quality of life…He is insightful and living day by day with learning new things. Our Perception is our reality & we should always be conscious, wise enough about our perception. Friendship teaches you to accept reality as it is.
मला पार्टनर भेटला की The Great व पू काळे आठवतात आणि त्यांचं पार्टनर बुक आठवत…त्यातील खालील संवाद आज पार्टनर साठी.
( वेटरने आणलेल्या बिलाच्या मागे मजकूर लिहून पार्टनरने माझ्या हातात ठेवला. )
मजकूर होता…
माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबरं टांगलं,
माझं दुःख, माझं दुःख, तळघरात कोंडलं!
‘बहिणाबाई ना?’
‘Yes.’
‘इतका चांगला संदेश बिलाच्या कागदावर उगीच लिहिलास. थांब, मी दुसरा कागद आणतो. हाच मजकूर पुन्हा लिही.’
पार्टनर म्हणाला, ‘अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही.’
‘असं कसं?’
‘माणूस नुसत्या काव्यावर जगत नाही. मागची बाजू व्यवहाराचीच.’
‘आणि एखाद्या अरसिक अकाऊंटस्मधल्या माणसानं बिलाची बाजू अगोदर पाह्यली तर…’
‘तर कागद फिरवून सांगायचं, व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहेत. नया पैशांत मांडता न येणारे!’
व पू
Thanks…Partner.. for Not only remaining a College Room Partner but partner in buliding my perception towards quality life.