भूतकाळाने भविष्याला गुणंताना बघणं जमणार नाही
ही आत पेटलेली मुक्तीची धुनी आता थांबणार नाही…
कस सांगु तुला?पुन्हा दर्दी लिहायला जमणार नाही
तुझ्या जखमी आठवणींच भांडवल ते उरलचं नाही
या कर्माच्या अकाउंट मध्ये चुक आपली काहीच नाही
या धुनीत…परत तसं दर्दी लिहायला जमणार नाही..
जे भेटलो ते ही हातात नव्हत, ताटातुटही हातात नाही
क्षमा करत जा चुका..मगं कुठलही बंधन उरणार नाही
पुन्हा भेटलोच तर शुन्य म्हणून, बाकी मात्र काही नाही
या पेटल्या धुनीत, जो लिहिणारा तोच उरणार नाही.
छान लिहले आहे सर👌👌👌
छान लिहले आहे सर