पृथ्वीवरील तीन प्रकारचे लोक

1.झंडुबाम लोक: हे लोक तामसिक, राजसिक गुणांनी भरपुर असतात .राग ,लोभ, मोह ,द्वेष यातच आयुष्य घालवतात, अशा लोकांना -ve गोष्टीतच मजा वाटते..
हे स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याच घर उद्ध्वस्त करतात…करणी करतात, नजर लावतात आणी हेच कर्म त्यांना बंधनात अडकवत जात जे कर्म नियमानुसार स्वतःवरच उलटत आणी हे स्वतःच्या मुकतीचा मार्ग स्वताःच बंद करतात. ही लोक अतृप्त राहुन मरतात आणी पुढ भुत होऊन हजारो वर्ष भटकतात नाहीतर नरकात त्रास भोगतात.

2.माझ्याबरोबरच वाईट का? लोकं: ही लोक थोडी +ve असतात..सात्विक गुणांकडे प्रवास करणारी असतात..पण मी वाईट नाही तरीही माझ्याबरोबरच का वाईट घडत अस सत्य मानुन स्वतः त्रास सहन करतात… माझ्याबरोबरच वाईट का?

सत्कर्म तर करतात, कुणाबद्दल वाईट चिंतन करत नाहित, पण कुठेतरी खरं ज्ञान कमी पडतं असतं आणी ते -ve लोकांच्या जोरदार प्रभावात अडकतात आणी संपुर्ण आयुष्य नुसतां भोग आहे असं समजुन भोगत बसतात.यांना मुकती ची ईच्छा तर असते पण अज्ञान बेहोशी तुटण्याचे प्रयत्न कमी पडतात. यातील काही जण सफल होतात आणी पुढील अवस्थेत जातात.

3.ईश्वरीय लोक: हे लोक सात्विक गुणांतुन गुणातीत अवस्थेकडे जातात.आपला जन्म हा मुळातच उच्चतम अभिव्यक्ती साठी झाला आहे ही जाणीव होऊन प्रेम,आनंद,शांती,क्षमा,दया या गुणांची अभिव्यक्ती करतात. ज्ञान, कर्म, ध्यान, जप, तप ई. मार्गातून भक्ती जागृत होते .ही ईश्वर भक्तीच मुक्तीसाठी महत्वाची आहे. स्वतःच्या मुक्तीबरोबर ईतरांच्या मुकती साठी प्रयत्न करतात. पृथ्वीवरील जीवनाचा उच्चतम लाभ म्हणजेच ती अवस्था प्राप्त करणं जी गौतम बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर,  संत तुकाराम अशा ईतर अनेक संतानी प्राप्त केली आणी मुक्त झाले व ईतरांनाही मुक्त करत गेले. हे लोक म्हणजे देवाशी एकरूपता प्राप्त झालेले भक्त असतात…

आपण कुठे आहेत ? हे शोधल पाहिजे. जे काही चुकलं असेल आजपर्यंत तर ते आधीच सगळं काही विसरा , माफ करा स्वताःला. जे घडलं तेव्हा अज्ञान होत… अंतस्थ ज्ञानाची ज्योत पेटवा.. वाल्हयाच्या वाल्मिकी होऊ शकतो…

शिकायला अन सुधारायला मरेपर्यंत वाव आहे.

धन्यवाद

Leave a Comment