20/80 तूझी आठवण

20/80 तूझी आठवण

तूझी आठवण म्हणजे…
सुरुवातीला चेहऱ्यावर येणार गोड हसू 20%
त्यानंतर येणारा भयंकर उदासीन एकांत 80%

तूझी आठवण म्हणजे…
सुरुवातीला पोहे खात मिळणारे शेंगदाणे 20%
त्यानंतर शेंगदाणे नसताना बळच खाल्लेले पोहे 80%

तुझी आठवण म्हणजे…
सुरुवातीला फालुदा मधली iceream 20%
त्यानंतर उरलेली शेवाई सब्जा बदाम 80%

तूझी आठवण म्हणजे…
सुरुवातीला परत जगावी वाटणारी रीच मेमरी 20%
त्यानंतर नको नको वाटणारी Bad मेमरी 80%

तूझी आठवण म्हणजे…
सुरुवातीच्या 2-3 पेग नंतर येणारी नशा 20%
त्यानंतर जास्तीचा नको असलेला हँगओव्हर 80%

तुझी आठवण म्हणजे आता
20% सुखं अन् 80% दुःख हा रुलच बनला आहे बघ !
आज मी 20% शास्वत , 80% अशास्वत वाटणारा
हा दैवी खेळ सोडतोय बघ !
नंतर भेटलोच तर पुन्हा शुन्य बनुन
तोपर्यंत तरी माझी वाट बघ….

Ganesh Sabale

Leave a Comment