हे न संपणार आहे
तुझ माझ एकमेकांशी होणारं
काळजीमुळे भांडण
हे न संपणार आहे
तुझ माझ एकमेकांवरच खर प्रेम
न मरणार आहे– मरणानंतरही
हे ही न संपणार आहे
तुझा माझा हा दरवेळेसचा निरोप
आणी कालचक्र फिरून झाल्यावर
झालेला पुन्हा प्रारंभ
हे ही न संपणार आहे
तुझ माझ अस असुन नसल्याच नाटक
आणी नसुनही असल्यासारखंच वाटण
हे काल्पनिक असेेेेलही, पण
हे ही न संपणार आहे
तुला मला कधीतरी हे सगळंच संपवाव वाटेल केली कितीही पुर्णता तरीही
काहितरी अर्धवट राहणार आहे
हे ही न संपणार आहे
तुला मला अर्धविराम देऊन पुढ चालावेही लागेल
अनं हवी असेलच मुक्तता बिन आरोप करता
तर निर्वाणाचे बळं अंगी रूजवावे लागेल
फक्त एवढंच …..
Mast!!!