वणवा : एका जंगलाने मागितलेली नुकसानभरपाई

वणवा : एका जंगलाने मागितलेली नुकसानभरपाई

दररोज टवटवीत दिसणार
जिवित जंगल हिरवेगार
आज जाळल गेलंय
एका पेटवलेल्या वणव्याने
हे नुकसान दरवर्षीच आता सहन होत नाही…

अपराधी असेलच माहित
एक स्वार्थी मानवजात
ह्या जातीचा स्वार्थ मरेपर्यंत संपत नाही
वणव्यात राख होण असत काय?
ते यांना आजन्म उमगत नाही…

पेटवणारा नरकस्वार्थी ज्याला दिसल नाही
खोलवर मुुळं न रुजलेली झाडे
नुकतीच जन्मुन होरपळलेली प्राण्यांची पिल्ले
पक्ष्यांची काडी न काडी विणलेली घरटी
ना दिसल्या अखंड कोटी किटकजाती
त्याला एवढ सगळ काहीच कसं दिसल नाही…

तुमच्यासारखी नुकसानभरपाई
आम्ही कधीच मागीतली नाही…
आणी मागीतलीच तर द्याल का?
आम्हाला आमच जंगल परत
हे अस राखेच जंगल करण एवढं सोप्प नाही…

तेही नाही जमलच तर फक्त एवढेच उपकार करा
कधी वणवा न पेटवण्याची भीष्मप्रतिज्ञा तेवढी करा ..

फक्त एवढच….


Leave a Comment