लग्नकार्य Waiting
आजकाल लग्न जुळवण हे तर औघड झाल आहे आणी आता तर लग्नकार्य पुर्ण करण ही चांगलीच औघड बाब झाली आहे. काही जवळची तीन,चार उदाहरण पाहिली तर खुप वाईट वाटत की जय्यत तयारी करूनही नेमकीच कोरोना लाट येऊन लाॅकडाऊन होतंच आणी सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी मुल मुली वाट पाहत दिवस ढकलत आहेत. तशी वस्तुस्थिती पाहता लग्न पुढे ढकलण बरोबर आहे पण अशा लाटा येत राहिल्यास लग्नकार्य रामभरोसे ठेवून चालणार नाही. सामान्य माणूस नेहमीच स्वतःचा , परिवाराचा , नातेवाईकांचा विचार करतो तो या दृष्टीकोनातून की कुणालाच त्रास होऊ नये .मग यावर उपाययोजना काय तर लस टोचुन घेणे व लग्नकार्यात कोरोना संक्रमण होऊ नये यादृष्टीने उपाय योजना करणे.
पण याउलट राजकारणी इलेक्शन झाल की सगळीच जनता रामभरोसे सोडून परत मूर्खासारखी कडक लाॅकडाऊन ची घोषणा करतात. इलेक्शन नंतर बरेच मृत्यू होतात , मग यांवर चौकशी होऊन गुन्हा नोंद का होत नाही अशा राजकारण्यांवर कारवाई करण कुणालाच जमणार नाही .पण सामान्य माणुस जेव्हा नियमानुसार चालत नाही तेव्हा दंड वसूल केला जातो, गुन्हा नोंदविण्यात येतो हे चुकिच आहे एवढच काय ते सामान्य माणुस चार चौघात बोलतो आणी नेहमीच आपल जीवाला भीत जगत राहतो.पण लग्नकार्य हे खुपच थाटात नाही तर थोड तरी व्यवस्थित व्हाव तर कुठेतरी हा आनंद सोहळा वधु वरास आयुष्यभर चांगली आठवण म्हणुन राहिल.
यावर मार्ग काय ? तूर्तास तरी वाट पाहणे.
मग तुम्ही मनावर दगड ठेवा किंवा समजुत काढुन फुंकर मारा
पण तयार रहा करेक्ट लग्न कार्यक्रम करायला आपल्या पट्टीत डाव येताच…..फक्त आपल्या पट्टीत डाव येण महत्वाच
Keep Waiting & Enjoy this process