एनआयसीयु च्या निळ्या प्रकाशित आकाशात
त्या रणभूमीवर मृत्युशी झुंजणारा तु योद्धा आहेस…
बाळं तु का आलास?
तुला माहित होता का हा खेळ?
त्या सर्वोत्कृष्ट पार्थास ही जमल नाही, पुत्र अभिमन्यूला
चक्रव्यूहातून सोडवणं
त्या सोबत होता कालचक्रधारी तरीही
त्यालाही नाही चुकल हे मृत्यूमनन…
मला उत्तर हवीत…सांग माझा गुन्हा काय?
काय आहे मृत्यु च गुढ? कि आहे मृत्यू ऊपरांत जीवन?
आणी असेलच तर तुझी भेट होईल का परत?
तु आजन्म मला साथ द्यायला का नाही आलास?
हीच तुझी मुक्ती की आम्हास मृत्युदंड?
बाळ मला ऊत्तर दिल्याशिवाय जाऊ नकोस…
काहीतरी बोल?
काहीतरी बोल?
.
बाळ.