मित्र का पाहिजे?

मनातल सगळं बायकोला सांग न औघड म्हणून
निखळ मनसोक्त मन जपणारी मैत्री पाहिजे…

हसणं कमी झालयं मग मनसोक्त हसता याव म्हणून
जिंदादिल मित्रांची पार्टी वजा मैफिल रंगली पाहिजे…

रंगलेल्या मैफिलिचे कुणाही घरी प्रतिसाद न उमटावे………. म्हणून साजूक तुपातला एकतरी मित्र जवळ पाहिजे…

मेडिकल सिच्युएशन मध्ये वाट न लागो म्हणुन
एकतरी चुना न लावणारा डॉक्टर मित्र पाहिजे…

निसर्ग,पाऊस,वारा,जंगल प्रेम समजावं म्हणुन
पाऊलं घरी न वळणारा निसर्ग आशिक मित्र पाहिजे…

जे पाहिजे तस घडेलचं याची शाश्वती नाहीच म्हणून
मित्र तयार झाले …शाश्वती एवढीच द्यायला की

काहीही होवो मित्रा,भावा,डार्लिंग काळजी करू नको

मी तुझ्याबरोबर सदैव आहे…म्हणुन मित्र पाहिजे…..

Leave a Comment