प्रेम आणि योग..

प्रेम आणि योग..

प्रेमात तिला मिळवण्यासाठी केलेला हट्ट …
त्या वयात तेव्हा तो हट्ट योग्य वाटला,
नंतर तोच पुढे हट्टरोग झाला
पुढे तो बरा व्हावा म्हणून
आयुष्यात हठयोग आला
….

प्रेमात तीच्यावरच केलेला फोकस , त्राटक
त्या वयात तो त्राटकच काय तो स्वर्ग वाटला
नंतर तोच पुढे आसक्ती नरक झाला
पुढे मन अनासक्त व्हावं म्हणून
आयुष्यात ध्यानयोग आला.

Leave a Comment