पाऊस

पाऊस

तो…तेव्हाचा
आपल्यातल्या शेवटच्या कडकडीत भांडणात
आभाळ फाटत झालेला…
काळया पांढऱ्या ढगांसम डोळ्यातील
संततधार पडलेला पाऊस…..
ताटातुट होत कोसळलेली ती वीज…
तो पाऊस एवढा जीवघेणाच
कि जगणंच अश्रुंच करून गेलाय…

तेव्हापासून पाऊस मला नकोच वाटायचा

पण आत्ता अगदी तसाच… अगदी तसाच
काळीज चिरणारा, रुद्र , स॔ततधार
पाऊस बघुन हसत असतो मी
कारण त्यानेच चंद्र, चांदणच काय ?
तर स्वयंभू सुर्यासही वेठीस धरलं आहे….
त्यालाही कदाचित कारण असेलच माझ्यासारखच
पृथ्वीशी ताटातूट जी होत असेल बिचाऱ्याची सर्वांमुळे
मग वेठीस धरून बरसत असेल
जसं मी तुला कल्पनेतच का होईना वेठीस धरतोय?
आणी बरसतोय ? 
आम्हा दोघांना फक्त हे असंच भरून भरून
बरसणंच काय ते जमतय….कदाचित?

Leave a Comment