देव जोड्या वर जुळवतो? या मागे Logic काय?

यामागे काय logic आहे?

देव जोड्या वर जुळवतो आणि भांडणं करायला खाली पाठवून देतो.

शक्यतो देव नेहमी विरुद्ध जोड्या जुळवतो कारण तसं एकच आपण थोडतरी सुधराव म्हणून, may be देवालाही सुधारणा करून घेण्याचं टार्गेट असेल बहुतेक….नाहितर प्रत्येकाचा अहंकार ठेचावा म्हणून तर नसेल…? 😁 देवाला तुम्हाला त्याचा सारखच बनवायचं असेल हे लॉजिक पण बेस्ट आहे.

संसारात सुरवातीला एका वाक्यात उत्तर देणारी ती आता प्रत्येक वाक्याचा उलट अर्थ काढून काढून भांडते. सुरवातीला आपली गोड गोड स्तुती करणारी नंतर पूर्ण खानदांनाची पाळेमुळे काढते. पण काही काळानंतर आता प्रत्येक डायलॉग पाठ झाल्या मुळे कधी कधी पुढची ओळ बोलून कॉमेडी भांडणं चालू होत. या विषया संदर्भात काही दिवसांपूर्वी काही लिहिलं गेलं ते अस

देव नेहमी विरुद्ध जोड्या जुळवतो ती speaker असेल तर तो listener असतो. कधी तो बोलणारा तर कधी ती ऐकणारी असते जर दोघेही speaker असतील तर मग शेजारचा भांडणं ऐकतो.

देव नेहमी विरुद्ध जोड्या जुळवतो ती Activeness असेल तर तो Laziness असतोतर कधी तो Activeness असेल तर ती laziness पण दोघेही laziness असतील तर जेवण द्यायला फकत swiggy असतो.

देव नेहमी विरुद्ध जोड्या जुळवतो ती feelings मधे जगत असेल तर तो facts मधे जगतोतर कधी तो feelings मधे जगत असेल तर ती facts मधे जगतेदोघे feelings असतील तर नुसतीच रडारड दोघे facts वर भांडतील तर नुसतीच चढाओढ

आम्ही दोन टोकाची लोक एकत्र संसार करतो… हे वाक्य यात समजूतदार पणा असेल तर खरी आयुष्यात मजा येईल नाहीतर zindagi नुसती सजा बनेल. एकाची strength दूसऱ्याची weakness असते हे गणित कळलं की support system develop होते. संसारात सर्वात महत्वाचा गुण तो म्हणजे संयम . खरा संयमी माणूसच संसार करू शकतो कारण त्याला कळलेलं असता की काहीही केल तरी समोरच्या माणसात बदल करू शकत नाही. जो काही बदल आहे तो स्वतः मध्येच करावा लागेल. प्रत्येकाची journey, life lessons एकत्र असलो तरी वेगळी आहे हे कळलं की बराच काही सोप्प होवू शकतं.

पण हे देवाचं लॉजिक समजलं की एकत्र जगण्याचं गणित सोडवण थोडं सोप्प होत जात, हे लॉजिक न समजणारे भोग म्हणून जगतात. Nature’s Logic is illogical sometimes…

God is Greatest Developer

Leave a Comment