देव आहे….त्याचीच लीला आहे ही सगळी….
तोच कर्ता करविता… तोच सुख कर्ता दुखः हर्ता
फक्त देवाला हाक मारता आली पाहिजे … प्रेमाने अधिकार गाजवला पाहिजे…भक्तीने, श्रद्धेने देव दर्शन देणारच…मग डोळ्याच्या कडा दाटुन येऊदेत नाहीतर ….अश्रुंचा पुर वाहुदे… पण काही करो… तो देव आला पाहीजेच….आणी देव येणार… त्याला यावच लागत….तो भावाचा भुकेला…प्रेमाचा भुकेला…
हेची वेळ देवा नका
नका मागे घेऊ…
तुज वीण जाऊ शरणं …शरणं कुणां
तुजविण कोण आहे…..कोण आहे मज…
पाहतोसी काये ?….काय सत्व माझे….
संत तुकाराम महाराज देवाला प्रेमाने, हक्काने हाक देतात… देवा आता मला तुच हवा आहे बाकी काही नको.
देव समजायला….अनुभवायला….
फक्त एक दुखःची घटना पुरेसी आहे … दुखःतच देवाची आठवण होते हा मानवी स्वार्थ नेहमी बरोबर नाही…म्हणुन स्वतःला सुखदुःखात जागृत ठेवणं….गुरूकृपेत ठेवण….ईश्वर इच्छेत राहणं….खुप महत्वाच आहे..