ती जेव्हा पुन्हा भेटली

खुप वर्षांनी आज तीची भेट झाली…. मागील वेळेस भेटलो तेव्हा ती तीच्या लग्नाच निमंत्रण द्यायला आली होती…तु प्लिज ये तु मला खुप साथ दिलिस तशीच ती मी मरेपर्यंत देशील …I want you as my friend forever …पण साॅरी मला नाही जमणार… मैत्री आणी प्रेम यात एका मोहाच्या धाग्याच अंतर असत…न राहवून मी तीला प्रपोज करून बसलो उत्तर अपेक्षित होतच कारण नुसती जात नव्हती तर आमचा धर्म वेगळा होता… पण मैत्रीच रूपांतर प्रेमात होतच…न कळत मर्यादा ओलांडली जाते ती एथेच…आणी मैत्री जीला श्रेष्ठ मानुन आम्ही जगलो ती प्रेम नावाच्या मोहात अडकवते… पण काय बरोबर अन काय चुक हे त्या विश्वनिर्मात्यालाच ठावुक … प्रेम, आकर्षण, मोह की निखळ मैत्री यात काय निवडल पाहिजे हे त्या वयात दुर्दैवाने उमजत नाही…मनाचा मनाशी चाललेला खेळ समजायला तेवढ भान अन जाणीव ती असते कुठे ?

आम्ही गुंतलो होतो अश्याच नात्यात , एकमेकांशी न बोलता राहण म्हणजे खरच किती औघड.. मला दोन वर्ष वेळ लागेल तुला विसरायला … ही झालेली अॅटॅचमेंट एक चक्रवयुह आहे, एक मायाजाल आहे यातुन बाहेर पडताना कुणी जीवन सोडतो कुणी बिघडतो… पण मी ठरवुन सांगितलं मला दोन वर्ष वेळ लागेल तुलाही हे विसरायला हव… या दोन वर्षानंतर मी आयुष्यभर एक खरा मित्र म्हणुन राहिल… अस सांगून मी दिलेला निरोप तीला आवडला नाही..तीने खुप प्रयत्न केले पण जे होत चांगल्यासाठी होत…. रडत खडत दिन गेले, वर्षे लोटली.

आठ वर्ष गेली .. तीचा राग कायम राहिला .. विश्वास गमावला होता परत पहिलयासारख होत नसत… पण झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी वेळच सर्वोत्तम पर्याय…. ही ॠदयाची गुंतागुंत संपायला वेळ जावु देण गरजेचं होतं…. but i miss my true friend & her true innocent friendship. त्यानंतर आम्ही बोललो, बोलायचो ते फक्त एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. मनातल मनात ठेवून जगण एकदम चुकिच आहे.

पण परत तसच घडेल काय? परत तशीच मैत्री निर्माण होईल काय? परत कॉलेज बाहेरील बसस्टॉप वर चार पाच तास उभे राहून गप्पा मारता येईल काय? परत मनसोक्त निखळ साधी सोपी अन सुरूवातीची तीची मैत्री मला भेटेल काय? तीच्या बरोबर घडलेली गोष्ट मी नेहमी डायरीत लिहित गेलो… तीचा स्वभाव खरच खुप चांगला होता आणी हेच एकमेव कारण पुरेस होत मला तीच्या प्रेमात पडायला…..हीच काय ती त्या वयातील चुक….निसर्गाचा खेळ हा…. कदाचित अस झालं असत तर , तस झाल असत तर हा मनाचा लपंडाव न संपणारा असतो… वास्तविक सगळं निसर्ग घडवतोय.

अर्धवट राहिलेल पुणँ करण , नात कुठलही असो त्यात समजुतदारपणा हवा, पुणँता हवी. मनाचा विचारांचा खेळ नको तर भावनांचे खरे संवाद हवेत…. मी तेच काय ते ठरवुन आज तीला भेटायला गेलो… जातानी एक उमेद की ती मैत्री, ती मैत्रीण मला परत भेटेल …तीला आज सांगायच एवढच होत की तुझी मैत्री गमावण कुणालाही परवडणार नाही…तु माझी कुंडली न जुळवता देवाने दिलेली मैत्रीण …

बरयाच दिवसांनी झालेली नजरा नजर… थोडीशी मनाची चलबिचल….हाताचा थरकाप हे स्वाभाविकच…तु एकडे कसा? मी खोट बोललो काम होत जवळपास महणुन आलो….पण खर काय ते मला माहित .. गेली आठ वर्षं आपण भेटलो नाही एवढ कारण पुरेस होत ..आणी गेली दोन वर्ष तर एक तास अंतरावर असुन सुद्धा भेटलो नाही.

माझ मन नेहमीच मला खात होत , साॅरी काही चुकल असल एवढंच बोलायला आलो होतो. मी आज मनसोक्त गप्पा मारल्या…. अव्यकत चा व्यकत झालो. तीनेही सुरूवातीला टाळाटाळ करून नंतर मनसोक्त गप्पा मारल्या… आज तीचा तोच खरेपणा, निरागसपणा पाहुन मी भारावून गेलो… 

आज ही ती तशीच आहे…आजही तीला खोटे बोलता येत नाही… मी पुर्वी नेहमीच हक्काने बजावून सांगायचो तसच आजही बोललो… काळजी घे… आपण नेहमी बोलत जरी नसलो तरी युनिवरस्ली कनेक्टेड आहोत ….कारण आपण खरे मित्र आहोत… फक्त खरेपणा जपण महत्वाच….

आणी काही जन्म मृत्यू प्रश्नांची उत्तरे तुही शोध… दुखाच कारण कुठलाही व्यकती आणी घटना नसुन आपले विचारच असतात…बरेचशे अदृश्य नियम समजुन घे….

दिवसेंदिवस तुझ्या जीवनात आनंद , शांती, समृद्धी, स्वास्थ्य, निखळ आणी निर्मळपणाची वृद्धी होवो हीच त्या निसर्ग, गाॅड, ईश्वर, अल्लाह…..कडे प्रार्थना…

Leave a Comment