तरूण पिढित जाणीव पेरणं गरजेच आहे
आपल्या पणजोबा पंजी ने कितीक गरीबीत अनं हलाखीत दिवस काढले ते माहीत नाही .पण आपल्या आज्जी आजोबांनी नक्कीच खुप वाईट परिस्थितीत दिवस काढले हे ऐकलं आहे… कधी दहा रूपयासाठी वर्षभर चाकरी करणं तर कधी लाकडाची मोळी घेऊन विकायला नेणं तर कधी दररोज वीस पंचवीस किलोमीटर चालुन दुध विकायला घेऊन जाणं एवढं आभाळाएवढं कष्ट का? कशासाठी ? तर फक्त नी फक्त आपल्या पिढिचा नाही तर आपल्या पुढच्या पिढिचा मुलांचा विकास व्हावा. मग ती सुरूवात शिक्षणातून झाली. न शिकलेली पिढी एकच सांगत गेली शिका, कामाला लागा.त्या प्रमाणे आमची सर्व वडिलधारी मंडळी शिकली कामाला लागली .अनं त्याच्या यशात सिंहाचा वाटा होता.तो जाणीवेचा…सतत मनात असलेली
जाणीव की …रूपयाला किंमत आहे..
जाणीव की… माणुसकी जपली पाहीजे
जाणीव की… समाजभान जपलं पाहीज
जाणीव की…आपण येणार्या पिढिला देणं लागतो
ही जाणीव आता तरूण पिढित कमी होताना दिसत आहे. आईबाप जे कष्ट करतात त्यांच मोल या तरूण पिढिन राखलं पाहिजे…हा विकासाचा पथ आहे..ही पूर्वजांची ईच्छा आहे की आपण जाणीवं ठेवावी… आपल्यावर असलेले उपकार आहेत ते…त्यामुळे
शिका, स्वहिमतीवर कमवा…
नुसतं मोबाईल ईनसटाग्राम फेसबुक बघुन पोटं भरत नसंत लेकहो…त्याने वाढते ती लालसा….आधी करियर करा…स्वकमाई करून दाखवा…. पण तुम्ही आईबापाचा जीव नका घेऊ ..ह्या आईवडिलांचा मोह संपणारा नसतो…पण तुम्ही लवकर डोळे उघडा… फक्त जाणीव ठेवा, अन लढा. तुमच अस्तित्व अमर्यादित आहे .. शोधा स्वतःला.
ही लढाई आहे….फक्त या लढाईत असत्याचा विजय न होवो.