चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात

बायको , चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात

चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात
ओळख आपली एवढी घट्ट की तिला विसरून जाऊयात
सेम सेम तीच रिपिटिटिव भांडण आता थांबवूयात
पाठ असलेले डायलॉग टोमणे सगळंच ते मिटवुयात
चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात….

चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात
प्रेमात पडलेल्या जोडप्यासारख कॅफे मध्ये भेटुयात
थोड तु कमी बोलशील, नुसतच लाजुन नजर चुकवशील
मी तुला इम्प्रेस करेल, तुला हसवण्याचा प्रयत्न करेल
थोडीशी धाकधुक होईल पण पुन्हा पुन्हा असच चोरून भेटुयात….

चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात
मग एक समाजमान्य अंतर ठेवुन बागेमधे भेटुयात
मग थोड अंतर तु कमी करशील, थोड कमी मी करेल
जवळ जवळ येता येता घट्ट मिठीत बिलगुयात
अन मीठीत पडता पडता वेगळाच ग्रह तो गाठूयात

चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात
परत सुखी संसाराची स्वप्ने आपण रंगवुयात
कर्तव्याच ओझं मात्र प्रेमगंगेत बुडवुयात
जे येईल संकट समोर त्याला तोडीसतोड उत्तर देऊयात
हा जन्मच सातवा समजुन अमरत्वाला पोहोचुयात
अन हा जन्मच सातवा समजुन निर्वाणगावी पोहोचुयात


1 thought on “चल आता पुन्हा एकदा अनोळखी होऊयात”

Leave a Comment