आतुन

माणुस आतुन शांत झाला
       की मग राग येत नाही…
शांततेत राहणं वेगळं
        अन शांत राहणं वेगळं…

माणुस आतुन प्रेममयी झाला
       की मग मोह उरत नाही…
प्रेममयी बनुन प्रेम देणं वेगळं
        अन प्रेम मागत फिरणं वेगळं..
.

माणुस आतुन समृद्ध झाला
       की मग गरीबी उरत नाही…
समृद्ध बनुन बुद्ध होणं वेगळं
       अन समृद्धीतही बुद्धु राहणं वेगळं…

माणुस आतुन तुकाराम झाला
       की मग देहाची मर्यादा उरत नाही…
समर्पणातुन सदेह मुक्ती गाठणं वेगळं
       अन हे आमचं वैकुंठगमन मर्यादितच सगळं !

Leave a Comment