आताशा सारख अस वाटत की

आताशा सारख अस वाटत की

आताशा सारख अस वाटत की
नेहमी काहितरी लिहित रहाव
जे सुचेल ते लिहता लिहता
काहितरी अद्भुत अस लिहिल जाव
अन तेच खर काय ते Devine असाव….

आताशा सारख अस वाटत की
जे गेलेत रागावुन त्यांना पत्राद्वारे कळवाव
नाही आल उत्तर लिहुन तरी चालेल
फक्त एक उचकी सारख काहीतरी व्हाव
अन त्यालाच काय ते मी पोहोचपावती म्हणाव….

आताशा सारख अस वाटत की
काही नात्यांतील वाढलेल अंतर कमी कराव
सात जन्म द्वेष करण्याच्या शपथा राहुदेत
जे आहे तिथच क्षमा करून मुक्त व्हाव
यालाच खर काय ते नवी पिढी अस म्हणाव
अन जे Feel होईल मनात ते थेट ….
फेसबुक, Insta अन whatsapp व्हाव….

……🖊©गणेश

2 thoughts on “आताशा सारख अस वाटत की”

  1. खरंच छान आहे,प्रतिभा अप्रतीम आहे पण त्या मागील विचार तर खरंच सुंदर आहे,इतक्या मोठ्या मनाचे कवी बद्दलं मी काय लिहिणार,शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकतो,keep it up…

Leave a Comment