आई आणी Harmonium

खरतर माणुस हा स्वतःच असं स्वार्थी आयुष्य जगत असतो…पण संसारात पडल्यावर मात्र तो निस्वार्थी होत जातो…सुरूवातीला जे जे काही हवय त्यामागे मनसोक्त धावत…धडपडत…जे हव ते मिळवत जातो…पण हेच गणित कालांतराने आई वडिल झाल्यावर बदलतं…माणुस निस्वार्थी होत जातो…अव्यकतीगत होत जातो…पण हे कर्तव्य बजावताना कित्येक आईवडील स्वतःची स्वप्न,  स्वतःच अस्तित्व, स्वतःच्या आवडी सगळंच काही बाजुला ठेवुन किंबहुना त्याग करून जगतात…काळाच्या ओघात  कित्येक आईवडीलांनी मनाला सावरून ॲडजसमेंट करत कित्येक अनमोल गोष्टींचा त्याग केला आहे हे शोधल तर मन थक्क होईल .

तसंच काहीस आईच्या बाबतीत घडलं…आईची घरची परिस्थिती तशी चांगली….पाच बहिनी एक भाऊ …आजोबांना भरपुर शेती आणी मग धान्य देखील  पंधरा वीस खंडीभर पिकत असे…असं असुन आईला शाळेत घातलं तरी शाळेत तीच मन काही रमलं नाही… तीला वेड होत ते भजनात दंग होऊन जाण्याच…शाळेत जायच सोडुन तीनं हार्मोनियम शिकायला वायळ काकांकडून सुरुवात केली…सगळी भजनं पाठं करून, हार्मोनियम पेटी वर तीनं विजयश्री प्राप्त केली…नंतर मोठ्ठ भजनी मंडळ तयार झाल ज्यात २५-३० मुलींचा सहभाग होता आणी सुरुवात झाली एका भजनी मंडळ स्पर्धा युगाला….त्या काळात म्हणजे  १९७१-१९८० च्या काळात आंबेगाव तालुक्यातील सर्वोत्कृष्ट भजनीमंडळ म्हणुन नावारूपास आलं तेच म्हणजे उगलेवाडी भजनी मंडळ…

ईश्वराची आराधना करायला भजन संगीतासारख माध्यम नाही…भजन ही परंपरा आहे संताची…गजर ओव्या अभंग भक्तीगीत गौळणी ही नुसतीच भजनाची रूपरेखा नसुन तीथ मनाच भंजन होऊन भक्तीचा प्रवाह वाहु लागतो…ग्रामीण समाजाच्या अध्यात्मिक सामाजिक मानसिक विकासावर या भजनी मंडळांच खुप महत्व आहे…संत ज्ञानेश्वर संत
तुकाराम संत एकनाथ संत चोखोबा संत जनाबाई संत सोयराबाई अश्या सर्वच संताची अनुभववाणी म्हणजे भजन…संत तुकाराम म्हणतात “मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतासी”  हीच ती सर्वोत्कृष्ट मानवी संभावना…प्रत्येक आईवडीलांस लाभो…

पण..
पुढं काय होणार…?
मुलीच लग्न झालं की जबाबदारी येते…आणी हा भजनाचा मार्ग संसारात आणी सासुरवासात समाप्त झाला…संसारात राहुनच परमार्थ याचा विचारही लुप्त होत गेला…किंबहुना आपली समाजव्यवस्थाच याला जबाबदार म्हणता येईल…कलेचा …छंदाचा… आदर करणं मुळातच आम्हास जमत नाही…जे जमल असत तर कित्येक आईवडील हे म्हातारपणात मुला नातवंडांच्या मोहात अडकुन, काळजीच्या डोहात वाहुन न जाता नेहमी मुक्त,  बिनधास्त जिंदादिल असते…

आज चाळीस वर्ष लोटली आईला भजन आणी हार्मोनियम सोडुन …

पण आज आईला हार्मोनियम गिफ्ट देताना तिच्या चेहर्‍यावरील आनंद हा एवढाच हेतु नव्हता …तर तीला तीचच एक तेच लहानपणीच खरं ईश्वरात तल्लीन होऊन एकरूप झालेलं मला पहायच आहे….तीला याच संगितातुन…याच भजनभक्तीतुन सर्वोत्तम स्वरूप दर्शन होवो हीच परमेश्वरा तुला तीचा मुलगा म्हणुन स्वार्थी प्रार्थना….

धन्यवाद….आई…आणी हार्मोनियम

2 thoughts on “आई आणी Harmonium”

Leave a Comment