आईच व्हाव लागत

आईच व्हाव लागत

आई….का ग दुरावत जातो मी तुझ्यापासून
आठवतय ते तुझ सकाळी पाच वाजता ऊठुन
सर्वांना डबा करून देण्यासाठी झालेली ओढातान
कष्टाने पेटवलेल्या राॅकेल च्या स्टोव्हचा तो आवाच
अन उठा रे म्हणून दिलेली शंभर वेळा निरंतर हाकच
हे हाकेसरशी धावणार पाखरूच तुझ का हरवलय
आज , आई का ग ते तुझ्या पासूनच दुरावलय

आई….का ग दुरावत जातो मी तुझ्यापासून

खरं किती मस्त ग काळ होता
तुझे फटके खातच शाळेत तुझा बाळ जात होता
बाबा कामावरून येतील नाराज होतील म्हणुन
संध्याकाळी भरवलेला तुझा दररोज फ्री तो क्लास होता
तुला नाही जमल शिकायला तरी प्रौढसाक्षर तु झालीस
शिकाव खुप मुलांनी एवढाच ध्यास तुझ ग होता
मुल वाढताना त्यांची माया का ग कमी होत जाते
तुला वेड ठरविताना जीभ कशी ग जड न होते

आई…
असच होत आलय का ग पुर्वीपासुन की
खरं आईच काळीज समजायला आईच व्हाव लागत
तुझी प्रेमापोटी काळजी, अन काळजातील अस्सल प्रेम
पडल्यावर,  लागल्यावर झालेली चलबिचल रुखरुख

मुलं आजारी असल्यावर तूझ्या डोळा न लागलेली झोप
अन तुझा मुलांच्या सुखासाठी चाललेला अनंत काळचा जप
डोळ्यात तरारलेल ते पाणी, तु किती किती वेळा ग लपवलस
तेच पुसायला गेलो तर , तु कर्तव्याखाली दडवलस
असच होत आलय का पुर्वीपासुन

असच होत आलय का पुर्वीपासुन
निसर्गच हा खेळ घडवतोय प्रेम, कर्माचा नियम ग शिकावतोय
की खरं आईच काळीज समजायला आईच व्हाव लागत
मुलं झाल्यावरच काय ते, खर आईपण आम्हाला कळत

ठेच लागते बाळाला अन काळीज कस टांगणीला लागत
निस्सीम निखळ निर्मल प्रेम समजायला आईच व्हाव लागत

खरं आईच काळीज समजायला आईच व्हाव लागत
कुंठ दाटुन येतो , पण हुंदकं मात्र लपवावच लागत
हे निस्सीम निखळ निर्मल प्रेम समजायला आईच व्हाव लागत

आईच व्हाव लागत


Leave a Comment