अस कधी झालय का
एखाद गाण ऐकता ऐकता
तुम्ही खोल कुठेतरी हरवत हरवत गेलात
अन तरारल पाणी डोळ्यात
एवढं की दिसु लागल अस्पष्ट…..
एवढ अस्पष्ट !
अस कधी झालय का
की एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात
तुम्ही फिरता फिरता जाणवल
आपण आधीच इथे येऊन गेलोय का
एवढ स्पष्ट की हा क्षण आधीच जगलोय ….
एवढ स्पष्ट !
अस कधी झालय का
की एखाद्या विचाराने प्रश्नाने झोप लागेनात
तुम्ही कासावीस बिसावीस होत कसतरी झोपी गेलात
अन सकाळी एकदम ऊत्तर घेऊनच बाहेर आलात
एवढं सोप्प ऊत्तर देत तरी कुणी झोपेत….
एवढ सोप्प !
अस कधी झालय का
की तुमच्या आतील आवाज सांगतोय की
तुम्ही एखाद काम जे करताय ते चुकीच आहे
अन त्याच फळ तुम्हाला लगेच मिळेल
एवढं पटकण की क्षणात ठेच लागते
नाहीतर एखादी वस्तुच डोळ्यांदेखत हरवते
एवढ पटकण !
अस बरच काही निराळ क्षण क्षण घडतय…
अस त्या त्या क्षणाला सतर्क राहील की
मग बरीच कोडी , बरेच प्रश्न असे निर्मितही होतात
आणि आपोआप सोडवले ही जातायेत…
आपण फक्त अनुभवतोय….हे अस ही
अस ही कधी झालय का?
मस्त रे….
मस्त लिहलाय
Nice bhava
Nice
Nice
Khupach chan