अभिव्यक्त

ही कविता
शोधताना आता
खरा ‘मी’ मला
सापडत आहे

ही कवित्वाची वाट
पकडता आता
नव आयुष्य
गवसत आहे

हे काव्यबीज अंगी
रुजता आता
नवा जन्मच
जणू होत आहे

हे काव्य
अभिव्यक्त होता आता
मन निर्मळ
प्रेमळ होत आहे

Leave a Comment