वाढदिवसानिमित्त पोवाडा

निलेश भाऊ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…आपली किर्ती कैफियत सांगणारा पोवाडा लिहायला मिळाला हे माझं थोर भाग्य… ❤️

पुरंदर च्या पायथ्याशी गाव…(३)
गावाच धनकवडी नाव…
जन्मला तीथं निलु ह्रदय सम्राट (२)
शाहिर म्हणे शून्यातून बनतो तोच सम्राट…
हा जी जी जी …(३)

पाहुनं परिस्थिती आसपास…(२)
धरली प्रगतीची त्यानं आस…
सोडला देवावरचा विश्वास
होती पैश्याची वणवणं तरी…
शिकुणं दिलं नियतीलाच आव्हान(२)
मोडेल पण वाकणार नाही हीच मावळी शान……..
हा जी जी जी (३)

कुणी आनंदासाठी फकिर तो जाहला
कुणी आनंदासाठी शाहिर तो जाहला
तु आनंदासाठी आशिक रं बनलास
जसा नल दमयंतीचा राजा…(२)
तसा तु शृंगारिक आशिक राजा
जीथ तीथ…आशिक..तु बनलास…
हा जी जी जी …(३)

Feel the music चा तु सम्राट
Photography हीच तुझी वहिवाट
तु मन समंदर लुटेरा जॅक स्पॅरो
तु नेहमीच व.पु काळेंचा फॅन
तु नेहमीच नुसरत साहेबांचा फॅन
झाला आज शाहिर साबळे तुझा फॅन….
हा जी जी जी …(३)

गातो माझ्या दोस्तांचे गुणगाण…हा जी जी जी …(३)

Happy Birthday Bhai 🎂

Leave a Comment